
वाखारी (प्रतिनिधी ) आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथील इंग्रजी विभागातर्फे वाखारी गावातील इंग्रजी विषयाचा वापर, महत्त्व व इंग्रजी विषयाची ची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी माहिती संकलित केली. यामध्ये गायत्री बिडगर, नेहा निकम, अश्विनी इंगळे, गायत्री निकम मोठ्या संख्येने इंग्रजी विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना प्रा संदीप दौंड यांनी सखोल प्रश्नावली तयार करून देण्यात आलेली होती.
विद्यार्थ्यांना इंग्रजी विभाग प्रमुख डॉ राजेश झनकर यांनी मार्गदर्शन केले सदरच्या सर्वेक्षण करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन यू पाटील सर यांनी मौलिक सूचना करून सदरच्या सर्वेक्षणाचा अहवाल महाविद्यालयात सादर करावे व संकलित माहितीच्या आधारे गावातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढवण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले
सदरच्या सर्वेक्षण प्रसंगी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. मराठे आय क्यू ए सी कॉर्डिनेटर प्रा. आटोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या सर्वेक्षणाकरिता भूगोल विभाग प्रमुख डॉ सी बी निगळे सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रसाद सर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अहिरे, मराठी विभाग प्रमुख प्रा वाघ तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
