
वाखारी (प्रतिनिधी):वाखारी गावात नांदगाव महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे लोकसंख्या व शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांनी 50 घरांचा लोकसंख्याविषयक व शैक्षणिक सर्वे केला यामध्ये प्रामुख्याने कुटुंबातील शैक्षणिक वातावरण तसेच कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबातील प्रमुख व्यवसाय, गावातील शिक्षणाच्या सुविधा, उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी अशा विविध गोष्टींचा सर्वे या सर्वेक्षणातून केला गेला. त्यामुळे या गावातील लोकसंख्येचा शिक्षण विषयक दृष्टिकोन कसा आहे हे समजण्यास मदत झाली. व गावातील लोकसंख्या जाणून घेण्यासाठी मदत झाली या कामी नांदगाव महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.सी. बी.निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्वे करण्यात आला. सदर सर्वेक्षणासाठी एस. वाय. बी. ए. व टी. वाय. बी. ए.या वर्गातील भूगोल स्पेशल घेतलेल्या सुमारे 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात गावातील लोकांशी संपर्क साधता आला व गावातील लोकसंख्याविषयक व शिक्षण विषयक स्थिती जाणून घेता आली.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी प्रेरणा दिली तसेच या सर्वेक्षणादरम्यान अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस एस. प्रसाद व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.झनकर सर, त्याचप्रमाणे भूगोल विभागाचे डॉ. बी. एम. अहिरे हे देखील उपस्थित होते.
