
सिन्नर (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद उर्दू शाळा सिन्नर येथे पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नायब तहसीलदार महामित्र दत्ता वायचळे यांच्या हस्ते फातिमा शेख प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला वायचळे साहेबांनी फातिमा शेख बद्द्ल माहिती दिली भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले.

फातिमा शेख ह्यांचा भाऊ मियां उस्मान शेख यांनी मदत केली व फातिमा शेख यांनी आपले भावाच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीमाई फुले यांनी वास्तव्य केले होते. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीमाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
घेतल्यानंतर. ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले.अशा महान फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन……..
महामित्र दत्ता वायचळे यांनी मुलांना शिक्षण साहीत्य व चाॅकलेट वाटप केलेया
यावेळी महामित्र दत्ता वायचळे मुख्याध्यापक मुसरत जहाँ मॅडम सहशिक्षक शबनाज शेख, अमरीन शेख सादिया काजी आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
