
नाशिक (प्रतिनिधी) साहित्यकणा फाउंडेशन नाशिक संस्थेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे ०१ फेब्रुवारी २०२६, (रविवार, वेळ – सकाळी ९.०० ते दुपारी १.३०) रोजी भव्य साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य स्पर्धा आयोजित केली आहे, स्थळ – समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर, डोंगरे वसतिगृह, नाशिक. स्पर्धा सशुल्क असून विजेत्यांना खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जातील. साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य स्पर्धा २०२६🏆साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य प्रथम सन्मान – रोख रक्कम १५००/- व सन्मानचिन्ह🏆साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य द्वितीय सन्मान – रोख रक्कम १२००/- व सन्मानचिन्ह🏆साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य तृतीय सन्मान – रोख रक्कम १०००/- व सन्मानचिन्ह🏆साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य चतुर्थ सन्मान – रोख रक्कम ७००/- व सन्मानचिन्ह🏆साहित्यकणा रजनी अनंत वाणी उत्तेजनार्थ सन्मान – रोख रक्कम ५००/- व सन्मानचिन्ह नियम व अटी१. कविता छोटी असावी. सादरीकरण कालावधी तीन मिनिटापेक्षा जास्त असू नये. अन्यथा गुण कपात करण्याचा अधिकार परीक्षकांना असेन. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. २. कविता स्वलिखित व मराठीच असावी. विषयाचे बंधन नाही, विषय फक्त कवीचा सन्मान होईल असा असावा.३. स्पर्धेत प्रत्येक सहभागी कवीचा सन्मान प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. ४. साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य स्पर्धा सहभाग शुल्क ४००/- रुपये आहे. ५. प्रवेश प्रत्यक्ष अथवा Phonepe / Googlepay – 9075618894 pranali फोन नंबरवर शुल्क भरून निश्चित करावा. ६. शुल्क भरून स्पर्धेस अनुपस्थित राहिल्यास शुल्क परत मिळणार नाही.७. शुल्क भरण्याआधी सचिव विलास पंचभाई यांना फोन करून मगच शुल्क भरावे, शुल्क भरल्यानंतर सचिवांना (७७७४९५५८९२)स्क्रिन शॉट पाठवावा व नाव नोंदणी करून घ्यावी.८. साहित्यकणा रजनी अनंत वाणी काव्य स्पर्धेत फक्त ६५ कविंनाच सहभाग घेता येणार आहे. स्पर्धकांनी सकाळी ८.३० वा. उपस्थित राहणे. स्पर्धा वेळेत सुरु होईल. ९. अधिक माहितीसाठी संपर्क :- साहित्यकणा सचिव श्री विलास पंचभाई – ७७७४९५५८९२, तरी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येते की, जास्तीतजास्त कवींनी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन शुल्क भरून आपला सहभाग निश्चित करावा ही विनंती. धन्यवाद. संजय द. गोराडे (अध्यक्ष)मो. नं :- ९८५०६९१२१६साहित्यकणा फाउंडेशन नाशिक
