
नाशिक रोड ( प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित,श्रीमान टी जे चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे हरितसेने तर्फे नायलॉन मांजा विरोधी प्रतिज्ञा व विद्युत सुरक्षा याविषयी व्याख्यान आयोजित केले गेले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ. .जितेंद्रकुमार राठौर, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल श्रीमती सोनाली संपत देशमुख, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी, पर्यवेक्षक किशोर झोटिंग उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक जितेंद्र गायकवाड यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगितले व नायलॉन मांजा विरोधी शपथ दिली.
डॉ. जितेंद्रकुमार राठौर सर यांनी प्रात्यक्षिकातून विद्युत सुरक्षा व नायलॉन मांजा वापरल्यामुळे जीवितास होणाऱ्या हानी बद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा पासून होणारे नुकसान आपण कसे टाळू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी यांचा परिचय शाळेच्या उपशिक्षिका प्रिया पवार यांनी करून दिला तसेच मान्यवरांचे आभार व कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या उपशिक्षिका प्रिया शेवाळे यांनी करून दिला.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा यापासून बचावासाठी पोस्टर्स तयार करून जनजागृती केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंदांनी परिश्रम घेतले.
