
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव पंचायत समितीचे वतीने शासनाच्या आध्यादेशानुसार एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाने तालुक्यातील 37 अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त जागेसाठी अर्ज आले होते त्या सर्व अर्जांची छाननी करून योग्य व पात्र उमेदवारांना गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पवित्र मुहूर्तावर सामाजिक कार्यकर्त्या सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले

आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांच्या दूरदृष्टीच्या नियोजनामुळे मागील दीड वर्षात तालुक्यात महिला व बालविकास विभागातील शंभरच्या वर जागा भरण्यात आले आहेत त्यामुळे अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यासाठी एकात्मिक बाल विकास व महिला प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांनी योग्य ते अर्ज छाननी करून गुणवत्ता असलेल्या महिलांची यादी तयार करून त्यांना आमंत्रित करून त्यांना सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते एकोणावीस अंगणवाडी सेविका व 18 मदतनीस या जागेसाठी आलेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले याप्रसंगी एकात्मिक बाल विकास व महिला अधिकारी श्रीमती प्राची पवार पर्यवेक्षिका जयश्री गवळी पुनम ताई शिंदे संजय पारखे शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप संगीताताई बागुल आणि रोहिणीताई मोरे उपस्थित होते

