
नांदगाव (प्रतिनिधी) अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.वाय.पी.जाधव यांच्यासह गंगाधरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचा आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत देवाच बंगला नांदगाव या आमदार निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे .यावेळी बोलताना डॉ.वाय.पी. जाधव म्हणाले यापूर्वी अण्णांच्या विरोधात काम करणे ही आमची अडचण होती. पण आमचे संबंध नेहमी चांगलेच होते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आणि संपूर्ण गावाने अण्णांसोबत यापुढे कायमस्वरूपी काम करण्याचे ठरविले आहे. आणि आम्ही पक्ष प्रवेश करीत आहोत. असे मत व्यक्त केले. माजी सरपंच सचिन जेजुरकर यांनी यामागे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. त्या पदरात घ्या, आणि आपल्या विकास वाटेवर आम्हाला सामील करून घ्या. आम्ही आजपासून आपले झालो असे मनोगत व्यक्त केले यावेळी गंगाधरीचे शाखाप्रमुख दिगंबर भागवत, भगीरथ जेजुरकर, भरत ईघे ,सुनील खैरनार, सोपान जाधव, उपस्थित होते. यावेळी डॉ. वाय पी जाधव, वसंतराव सोनवणे, गोविंद नाना जाधव, बाळूभाऊ भागवत, बाळकृष्ण खैरे, नंदू भाऊ सोनवणे ,गंगाधर जाधव, रमेश गांगुर्डे, सरपंच दुर्गा जाधव, सचिन जेजुरकर, विश्वजीत जाधव, गोकुळ जेजुरकर, ताराचंद जाधव, रितेश जाधव, दत्त सोमासे संजय कोमोदकर, योगीराज जाधव ,संदीप खैरनार, काळू जेजुरकर, किशोर सोनवणे, आदींनी पक्ष प्रवेश केला.

