
सिन्नर ( प्रतिनिधी ) ९ जानेवारी २०२६ भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सिन्नर येथे महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात फातिमा शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
पुर्वी बहुजनांना स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात १जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली.ज्योतिबांच्या प्रोत्साहनामूळे सावित्रीमाई मुलींची शाळा सुरू करणाऱ्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षक बनल्या. तर, त्याच शाळेत त्यांच्या एक सहकारी होत्या. त्याच या फातिमा शेख होय.सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून फातिमाजींनी पहिली मुलींची शाळा उभारण्यात व ती यशस्वीरित्या चालवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.फातिमा शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ मध्ये पुण्यात, झाला. त्या काळात स्त्रीयांनाही शिक्षण देण्याची गरज आहे ही कल्पनाच नव्हती. महिलांना चूल आणि मूल यामध्येच अडकून ठेवले जात होते आणि त्यांना शिक्षण दिले जात नव्हते.१८४८ मध्ये मुलींसाठी भारतातील पहिल्या शाळांपैकी एक सह-स्थापना केली. आणि तिचे नाव स्वदेशी लायब्ररी ठेवले. फातिमा शेख आणि सावित्रीमाई फुले यांची भेट झाली जेव्हा त्या दोघींनी ‘सिंथिया फरार’ या अमेरिकन मिशनरीद्वारे चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला.मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीमाईच्या लढ्याचा साक्षीदार भिडे वाडा!फातिमा शेख यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांना अशा वेळी पाठिंबा दिला. जेव्हा काही कट्टरवाद्यांना त्यांची महिला शिक्षित करण्याची मोहीम आवडली नाही. त्यामूळे दोघांनाही घराबाहेर काढण्यात आले. मग फातिमाजींनी व त्यांचे भाऊ मियां उस्मान शेख यांनी या दोघांना आपल्या घरात राहण्यासाठी जागा तर दिलीच, पण मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा उघडण्याचीही जागा दिली.त्यावेळी शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत फातिमा शेख केवळ शाळेतच शिकवत नसून प्रत्येक घरोघरी जाऊन मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत होत्या. त्यामुळे त्यांना समाजातील काही घटकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.सावित्रीमाई फुले यांनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिक्षणाच्या प्रसाराचे काम केले. त्यांनी कधीही कोणत्याही मुलामध्ये धर्म-जातीच्या आधारे फूट पाडली नाही. तर प्रत्येक धर्माच्या मुलांना आपुलकीने शिकवण्याचे कौतुकास्पद काम केले.या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना सत्यशोधक समाजाची चळवळ म्हणून मान्यता मिळाली. शेख यांनी घरोघरी जाऊन त्यांच्या समाजातील दलितांना स्वदेशी ग्रंथालयांमध्ये शिकण्यासाठी आणि भारतीय जातिव्यवस्थेच्या कठोरतेपासून वाचण्यासाठी आमंत्रित केले. त्याला मोठ्या कट्टरपंथीयांच्या प्रतिकारालाही सामोरे जावे लागले. पण, फातिमाजी स्त्रीशिक्षणासाठी लढण्यात कधीच मागे हटल्या नाहीत अशा या थोर शिक्षिकेला विनम्र अभिवादन!
या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिशा वायचळे हिने केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार भुषन मोरे यांनी मानले
या कार्यक्रमाला महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, बाळासाहेब मुठे अभिशा वायचळे,भुषन मोरे , राजेंद्र बेंडकुळे, नारायण परदेशी गणेश वाघमारे, अमोल (बंन्टी) सातभाई रोहित मुठे निखिल चौधरी,प्रकाश गुंजाळ योगेश मोरेआदि उपस्थित होते.
