
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४६ वा दिवस
बुद्धीसंपन्न आणि लोकसेवेसाठी सर्वस्व समर्पण करणारे युवक हवेत. माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणही ओवाळून टाकण्याची सिद्धता असलेल्या आणि त्याद्वारे स्वतःचे आणि संपूर्ण देशाचे कल्याण करू शकणाऱ्या अज्ञांकित युवकांवरच माझ्या भविष्यातील आशा केंद्रित झाल्या आहेत. सर्वसामान्य मुले माझ्याकडे येतच असतात. त्यांच्या मुद्रेवर तेज नसते, त्यांच्या हृदयात उत्साहाचा अभाव असतो, त्यांची शरीरे दुबळी कुचकामी असतात आणि मनात धैर्याचा लेशही नसतो, अशांकडून काय काम होणार? नचिकेताची श्रद्धा असलेले १०० युवक मला मिळाले तर या देशातील विचारांना आणि कार्याला मी नवी दिशा देऊ शकेल. मी जग बदलून दाखवेल.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २० शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १० जानेवारी २०२६
★ विश्व हिंदी दिन
★ १६६६ मध्ये सुरत लुट करुन शिवाजी महाराज रायगडाकडे रवाना.
★ १७३० पुण्यातील “शनिवार वाड्याच्या” बांधकामास प्रारंभ.
★ “बचेंगे तो और भी लढेंगे” असे म्हणणारा पानिपत रणसंग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचा स्मृतीदिन (१७६० मध्ये कुतुबशहाने दत्ताजींचा शिरच्छेद केला)
★ १८७० मुंबई येथील “चर्चगेट” रेल्वे स्थानकाचे उद्घाटन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
