
नांदगाव ( प्रतिनिधी) दर्पण ने समाजातील अज्ञान दारिद्र्य भाकर समजुती विरुद्ध आवाज उठवला व स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनजागृती केली हे वृत्तपत्र मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे याचे स्मरण आपण सर्वांनी करावे यासाठी हा पत्रकार दिन साजरा केला जातो असे प्रतिपादन नांदगाव – मनमाड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांनी केले.

ते पत्रकार दिनानिमित्त नांदगाव येथील भारतीय सदन येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती आयोजित केली होती. जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब परदेशी,जगननाना पाटील, मारुती जगधने, सोमनाथ घोंगाणे, संदिप जेजूरकर ,नरहरी उंबरे,तुषार गोयल, बाबासाहेब बोरसे,प्रा.सुरेश नारायणे,व आदी मान्यवर पत्रकारांनी दिपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजन केले. यावेळी नांदगाव संमता बॅंकेचे गौरव जोशी, व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित पत्रकारांना भेट वस्तू देऊन गौरव केला.

वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे यांत्रिकीकरणामुळे पेपर अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक बनला आहे त्यामुळे या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे परंतु पत्रकारांचा बाबत प्रगती दिसून येत नाही म्हणून त्यांच्या उदारनिर्वाहसाठी पत्रकारांनी इतर प्रवासात देखील उतरणे गरजेचे आहे पत्रकारांची आर्थिक बाजू भक्कम असणे या स्पर्धात्मक किंवा महत्त्वाची बाब बनली आहे तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत या समस्यांना तोंड देत ते आपली पत्रकारिता जागवत आहे म्हणून त्यांच्या समस्या पत्रकार संघ आणि शासनाने सोडविण्याची गरज आहे असे मनोगतात.नरेश गुजराथी यांनी मत व्यक्त केले.

यावेळी ग्रामीण भागात अनेक वर्षं पत्रकारिता करत असलेले जगन पाटील, रामदास सोनवणे,यांनी ग्रामीण पत्रकारिता आणि पत्रकार यावर विचार व्यक्त केले.तर निलेश्वर पाटील यांनी प्रेस फोटोग्राफर यांच्या समस्यांवर विचार व्यक्त केले. तर प्रा. सुरेश नारायणे यांनी नाट्यछटेतुन पत्रकारांची व्यथा मांडली.

पत्रकारांनी वास्तव बातम्या द्याव्यात व समाज प्रबोधन होईल याकडे पत्रकारांनी लक्ष द्यावे असे विचार जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब परदेशी यांनी व्यक्त केले.

यावेळी बीबीए चे शिक्षण घेत असलेल्या क्षितिजा जगधने यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पत्रकारीता विकसित कशी करावी या बाबतचे मार्गदर्शन केले. तर डिजिटल मिडिया बाबतचे विचार योगेश म्हस्के व आनंद बोथरा यांनी मत मांडले.

यावेळी संदिप जेजूरकर, गणेश केदारे,लिहिले सर , अशोक बिदरी, निलेश वाघ, मारुती जगधने, तुषार गोयल,प्रमित आहेर, सोमनाथ घोंगाणे,सोमनाथ तळेकर, दुकळे, स्वराज सोनवणे, रामदास सोनवणे, आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाली परदेशी यांनी केले.मारुती जगधने यांनी पत्रकारावर आधारीत कविता सादर केली. व शेवटी नांदगाव -मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप जेजूरकर यांनी आभार मानले.

