
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४५ वा दिवस
गुढवादाच्या मागे लागणे आणि अंधश्रद्धांचे बळी होणे ही दौर्बल्याची आवनतीची आणि साक्षात मृत्यूची चिन्हे आहेत. त्यांच्यापासून सदैव सावध असा. कणखर व्हा! कसल्याच कुबड्या न घेता स्वतःच्या पायावर उभे राहा. आपल्या आकलनापलिकडच्या निसर्गघटनांना आपण चमत्कार म्हणतो, पण खरं म्हणजे गुढ असे त्यात काहीच नसते. धर्मातील सत्ये हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवर तपस्या करणार्या काही गुप्त मंडळींची मिरासदारी नाही. अशी रहस्यमय गुप्त मंडळी कुठेही अस्तित्वात नाहीत. उगाच अंधश्रद्धेच्या मागे लागू नका त्यामुळे अवनती आणि मृत्यू यांची वाट चालण्यापेक्षा तुम्ही सरळ नास्तिक झालात तरी सुद्धा तुमचे आणि या समाजाचे भले होईल.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १९ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२६
★ १८६३ स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन (तिथीनुसार)
★ ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आलेत.
★ प्रवासी भारतीय दिन…
★ १९२३ पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा स्मृतीदिन.
