
नांदगाव (प्रतिनिधी): पत्रकार दिनानिमित्त नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव शहराचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, जेष्ठ पत्रकार संजीव धामणे, विजय चोपडा तालुकाध्यक्ष संजय मोरे, प्रा. सुरेश नारायणे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पत्रकार संघाच्या वतीने माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सागर हिरे, प्रा. सुरेश नारायणे, जेष्ठ पत्रकार संजीव धामणे, वाल्मीक जगताप, डॉ. गणेश चव्हाण, सुनील जाधव यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा उल्लेख करतानाच दर्पण कारांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती व सकल धनगर समाजाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्मारक समितीचे डॉ. गणेश चव्हाण, सुनील (हरिओम)सोर, बिरु शिंदे,
दीपक भिसे, संतोष सोर, भिका खटके, शंकर आयनोर, सुनील मेंगनर, गणेश सोर, राम शिंदे, दीपक बनगर, कृष्णा खांडेकर, चेतन शिंदे, नितीन सोनवणे, सतीश बिडवे, सुरेश निकम यांचेसह नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे महेश पेवाल, मोहम्मद शेख, गणेश जाधव, अनिल धामणे, विजय भावसार, सचिन पांडे, बाबासाहेब काळे, सचिन गायकवाड, निखिल मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल आव्हाड यांनी केले. आभार चंचल गंगवाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
