
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४४ वा दिवस
भिन्न भिन्न रूपे असले तरी अग्नी जसा एकच असतो तसे ते विराट चैतन्य एकच आहे. मग ते फ्रेंचांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या रूपाने व्यक्त होवो, इंग्रजांच्या व्यापारी बुद्धीतून आणि समान लाभाच्या तत्त्वातून व्यक्त होवो किंवा हिंदूंच्या मुक्ती आणि आत्मिक स्वातंत्र्याच्या आकांक्षेतून व्यक्त होवो. याच महान चैतन्याच्या प्रेरणेतून शतकानुशतके फ्रेंच आणि ब्रिटिश राष्ट्रीय स्वभाव घडला आहे आणि त्याच चैतन्याचे स्फुरण म्हणून सहस्रावादी वर्षांचे हिंदू चारित्र्य देखील घडले आहे. सहस्रों वर्षांच्या परंपरेतून विकसित झालेले आपले राष्ट्रीय चारित्र्य सोडणे सोपे की, केवळ काही शतकांचा आपल्यावर कलम केला गेलेला कोणता तरी परकीय संस्कार मोडणे सोपे?
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १९ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६
★ १९४२ सुप्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञ व लेखक स्टीफन हॅकिंग यांचा जन्मदिन.
★ १९४१ बालवीर चळवळ (स्काऊट गाईड) चे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा स्मृतीदिन.
★ १९७३ दैनिक सकाळचे संस्थापक संपादक, भारतीय पत्रकारितेचे पितामह नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर यांचा स्मृतीदिन.
