
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी विधेयक सूचना केल्यास त्याचे स्वागतच केले जाईल. व प्रसंगी शहराच्या विकासासाठी काही निर्णय कठोरी घ्यावी लागतील असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त आणि दीपंत मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार संजीव निकम, सभागृह नेत्या स्वाती नावंदर, प्रशासन अधिकारी हर्षदा राजपूत, बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर उपस्थित होते. नगराध्यक्ष सागर हिरे, नगरसेवक काका सोळसे, बाळासाहेब शेवरे, वाल्मीक टिळेकर,दीपक पांडव, काशिनाथ देशमुख,कल्पना जगताप,ॳॅड.विद्या कसबे,राखी जाधव, स्नेहल पाटील,रुपाली पाटील,योगिता खरोटे, गायत्री शिंदे, यांच्या हस्ते

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.नगराध्यक्ष सागर हिरे यांनी शहरातील पाण्याची समस्या,व इतर समस्या येत्या काही दिवसातच आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल नावांदर,नगर सेवक राजेश शिंदे, पत्रकार संदिप जेजूरकर, संजीव निकम, प्रा.सुरेश नारायणे आदींची भाषणे झाली.यावेळी बाबासाहेब कदम,संजय मोरे , अनिल आव्हाड,संदिप जेजुरकर,प्रा.सुरेश नारायणे, महेश पेवाल,महेंद्र पगार, सचिन बैरागी ,किरण काळे, मोहम्मद मोहम्मद शेख, अनिल धामणे,चंचल गंगवाल,विजय भावसार,आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव यांनी सुत्रसंचलन केले.

