
मुळडोंगरी (प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे दिनांक 06/ 01/ 2026 रोजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस्.एस्. मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,शिक्षक वर्ग,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शांताराम भाऊ मोरे यांनी स्वीकारले.आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.बोरसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कलाक्रीडा व संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण केले. यात नृत्य, समूहगीत,एकांकिका, लघुनाट्य, देशभक्तीपर गीत तसेच लोक नृत्य यांचा समावेश होता विद्यार्थ्यांचा सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने करण्यात आला.शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आणि उपस्थितितांसाठी आनंददायी ठरले.
