
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४३ वा दिवस
विकाराची प्रत्येक लहर संयमाने थोपवा. ते तुमच्या हिताचे आहे. एक जीवीततत्व म्हणून तुम्ही अक्रोध तर फारच उत्तम. पण नुसते धोरण म्हणून जरी तो स्वीकारलात तरीही उपयोग आहे. ख्रिस्त म्हणाला दृष्ट प्रवृत्तींची उपेक्षा करा. जोपर्यंत आपल्याला अक्रोधाचे नैतिक आणि व्यवहारिक मूल्य कळत नाही तोवर या वचनाचा अर्थ कळणार नाही, संतापाने फार शक्तीपात होतो. म्हणून संताप आणि द्वेष या विकारांना मनात थाराच देऊ नका. संताप विद्वेष वा अन्य विकारांच्या आहारी जाणाऱ्यांच्या हातून काम तर होत नाहीच, उलट तो स्वतःचा विनाश करून घेतो. शांत क्षमाशील, समतोल वृत्तीची माणसेच फार मोठे कार्य उभे करू शकतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १८ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ७ जानेवारी २०२६
★ १८९२ नाशिकचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन यांना बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारणारे युवा क्रांतीकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा जन्मदिन
★ २००० सुप्रसिध्द गणितज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांचा स्मृतीदिन
★ १९७२ विवेकानंद केंद्र कन्याकुमारी स्थापना दिन.
★ विवेकानंद केंद्र स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐🌸🌸🌺🌺🕉️
