
मोहाडी:-(बातमीदार) मविप्र संचलित थोरात विद्यालयात दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पत्रकारांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले.पत्रकार दिन निमित्त विद्यालयाचा वतीने नूतन वर्ष दैनंदिनी शाल गुलाब पुष्प देऊन उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सायली गणोरे,श्रुती गणोरे .समृद्धी पिंगळ या विद्यार्थिनी भाषणे झाली तर त्यांना त्यांच्या वर्गशिक्षिका रूपाली जाधव यांनी मार्गदर्शन केले.पत्रकार संदीप गुंजाळ व संतोष कथार सर यांनी मनोगत व्यक्त केले.पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून समाजात राहून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात असे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण नाना जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमास संचालक श्री प्रविण नाना जाधव, सुरेश सोमवंशी प्राचार्य श्री शिवाजी शिंदे उपप्राचार्य गोसावी ए आर, पर्यवेक्षक पठाडे एस एस, ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव सह दिंडोरी तालुक्यातील पत्रकार नंदकुमार डिंगोरे, संतोष कथार सुनिल घुमरे समाधान पाटील अमोल जाधव उत्तमराव जाधव सुकदेव खुर्दळ बापू चव्हाण अशोक केंग संदिप गुंजाळ रोहिदास गायकवाड गोरख जाधव अमोल देशमुख जितेंद्र शिंपी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोविंद बैरागी तर ज्ञानेश्वर भवर यांनी आभार मानले. पत्रकार दिनाचे सुंदर असे फलकलेखन कलाशिक्षिका नाठे सी एफ यांनी केले.
