
मराठी साहित्यविश्वातील दीपस्तंभ, साहित्य पंढरीचे पांडुरंग कुसुमाग्रज यांच्या ११३ व्या जयंती वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण साहित्यिक घटना घडत आहे.
[आठवणीतील कुसुमाग्रज] हा समृद्ध, संदर्भमूल्य असलेला अक्षरग्रंथ लवकरच रसिक वाचकांच्या भेटीला येत आहे.
ग्रंथाविषयी
साप्ताहिक कुसुमाग्रज नगरचे संपादक रामदास नागवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रमातून साकारलेला हा सुमारे २०० पानांचा, दर्जेदार कागदावर मुद्रित केलेला ग्रंथ आहे.
जवळपास ५६ लेखकांच्या हृदयस्पर्शी, अविस्मरणीय आठवणी, अभ्यासपूर्ण लेख, संपादकीय व निवडक कवितांचा यात समावेश आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ स्मृतिग्रंथ न राहता संदर्भग्रंथ म्हणूनही महत्त्वाचा ठरतो.
🗓️ भव्य प्रकाशन सोहळा
📍 स्थळ : परशुराम सायखेडकर नाट्यगृह, सार्वजनिक वाचनालय, श्रीक्षेत्र नाशिक
🕒 दिनांक व वेळ : रविवार, ११ जानेवारी २०२६, दुपारी ३ वाजता
🌄👑 ख्यातनाम गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या शुभहस्ते ग्रंथप्रकाशन होणार आहे.
अध्यक्षस्थान : विद्वान व अक्षरतपस्वी डॉ. दिलीप धोंडगे
विशेष अतिथी : नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
✍️ साहित्यिक वैभव
या ग्रंथात कुसुमाग्रजांच्या जीवनातील अमृतस्मृती, सामाजिक जाणिवा, मानवतावादी विचार आणि त्यांच्या अजरामर कवितांचा समावेश आहे.
उठा उठा चिऊताई, मौन, कणा, गाभारा, क्रांतीचा जयजयकार यांसारख्या कवितांमुळे नव्या पिढीला कुसुमाग्रजी विचारांचे तेज अनुभवता येईल.
🌿 सर्वांसाठी संग्रहणीय
कुटुंबे, वाचनालये, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, साहित्यसंस्था तसेच देश-विदेशातील मराठी मंडळांनी हा ग्रंथ संग्रही ठेवावा, इतका तो सर्वस्पर्शी व प्रेरणादायी आहे.
🌄👏 संपादकाचे अभिनंदन
सत्तर ओलांडलेल्या वयातही जिद्द, चिकाटी व मूल्यनिष्ठ पत्रकारितेच्या बळावर साहित्यसेवा करणारे संपादक रामदास नागवंशी यांचे हे कार्य खरोखरच वंदनीय आहे.
📞 संपर्क : ९२२५९२२५२०
— सावळीराम तिदमे
✨ मराठी साहित्यप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे.
