
वेहळगाव (प्रतिनिधी) गावदरा शाळेत खडकावर फुलवली मुलांनी आणि शिक्षकांनी परसबाग प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्यात आलेला आहे. तोच उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा(वेहेळगाव)ता. नांदगाव गावदरा शाळेत खडकावर फुलवली मुलांनी आणि शिक्षकांनी परसबाग जि. नाशिक यांनीही राबवला परंतु पूर्ण खडकाड जमीन आजूबाजूला गाई,म्हशी, बकऱ्या व मेंढ्या अशा प्राण्यांचा वावर तरीही या शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थांनी आपली जिद्द सोडली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने काळी माती आणली. समग्र अनुदानातून जाळीच कुंपण केले.रोप लावून संगोपन केले आणि मग काय खडकावर हळू हळू परस बाग फुलू लागली दोन तीन महिन्यांनी आलेलं फळ भाज्या पाहून मुले आनंदी झाले. हा सर्व भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जाऊ लागला. आणि त्याबरोबर सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला मुलांना आहारात मिळू लागला. हळू हळू भाजीपालाचे प्रमाण वाढले व आज चक्क मुलांनी वेहेळगाव चा बाजाराचे निमित्त पाहून भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले तर गावच्या वस्तीवरच सर्व भाजीपाला विकला गेला.त्या विक्रीतून मुलांना दोनशे साठ रुपये (260)मिळाले पैसे कमी असले तरी त्यामागे मेहनतीचा आनंद खूप जास्त आहे असे शिक्षक आणि मुलांनी बोलून दाखवले. शासनाचा खरा उद्देश मात्र नक्कीच यातून साध्य झाला असे तरी वाटतेय. मुलांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे काय घडू शकते हे पालकांनी खूप जवळून पाहिले. म्हणून गावाततील महिला वर्गाने भाजीपाला खरेदी करायला गर्दी केली व श्री विलास सोनवणे, श्री महेश थोरे व हर्षदा शिवदे यांचे भरभरून कौतुक केले. आज मुलांनी वांगी, हिरवी मिरची, फुलकोबी, टॉमॅटो, कोथिंबीर व बटाटे विक्री केले त्यातून व्यवहार कसा केला जातो ही शिकवण ही मिळाली. श्री विलास सोनवणे यांनी ह्या शाळेत खूप नवनवीन उपक्रम राबले आहेत त्यामुळे गावदरा शाळेला आत्तापर्यंत लाखाच्या जवळपास लोकवर्गणी स्वरूपात वस्तू ही मिळाल्या आहेत आत्ता श्री महेश थोरे सर आणि विलास सोनवणे शाळेच्या प्रगती साठी अजून प्रयत्न करीत आहेत.
