
ओझर: दि.६ (वार्ताहर)आधुनिक शिक्षण हे माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मूलभूत सुविधा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी केले. ते ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्मवीरांचा त्याग व चळवळीतून उभी राहिलेली महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा विकास व वाटचाल प्रगतीपथावर असून इमारत चांगली असेल तर अध्ययन अध्यापनासाठी वातावरण चांगले होते

म्हणून शिक्षकांनी उत्कृष्ट ज्ञानार्जन करावे अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यार्थ्यांनी संस्थेत तंत्रज्ञानावर आधारित डिप्लोमा इंजीनियरिंग फार्मसी मेडिकल कॉलेज तसेच एआय सारखे नवीन बौद्धिक कौशल्य विकास कोर्सेससाठी प्रवेश घेऊन गुणवत्तापूर्ण ज्ञान मिळवावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, कर्मवीर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले. स्वागतगीत व इशस्तवन शालेय गीतमंच व संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी सादर केले. नूतन इमारत पूजन आचार्य हेमंत भट यांच्या वास्तु मंत्रघोषाने शालेय समिती अध्यक्ष भास्करराव शिंदे व सौ चंद्रकला शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी नूतन इमारत कोणशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मान्यवरांनी नूतन इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शालेय फलकाचे अनावरण भास्करराव शिंदे यांच्या हस्ते झाले.अतिथी सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांचा सत्कार मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे हस्ते, अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांचा सत्कार भास्करराव शिंदे यांचेहस्ते, सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांचा सत्कार मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्याहस्ते, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांचा सत्कार ॲड शामराव पगार यांचे हस्ते, उपसभापती देवराम मोगल यांचा सत्कार सुभाष चौधरी यांचेहस्ते, चिटणीस दिलीप दळवी यांचा सत्कार प्रकाश महाले यांचेहस्ते, तर संस्थेच्या सर्व मान्यवर संचालकांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी शालेय कामकाज व नव उपक्रमांची मागणी संस्था पदाधिकाऱ्यांकडे करून सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्यावर स्वलिखित ‘समर्पण’ कविता सादर करून विद्यार्थी हेच दैवत असल्याचे सांगितले.

प्रारंभी संचालक शिवाजी गडाख उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ सुनील ढिकले यांनी शाळेची संख्यात्मक वाढ झाली आहे मात्र गुणात्मक वाढ होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी भाषणात विद्यार्थी हा केंद्रस्थानी असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने अनेक उपक्रम सुरू असल्याचे सांगून संस्थेच्या शाखा विस्तार कामकाज व प्रगती याविषयी मनोगत व्यक्त केले. येथील प्रशस्त इमारत बांधकामामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध झाल्याने संस्थेचे आभार मानले. व्यासपीठावर सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे पदाधिकारी अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले उपाध्यक्ष विश्वासराव मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी संचालक शिवाजी गडाख ॲड संदीप गुळवे डॉ सयाजीराव गायकवाड ॲड लक्ष्मण लांडगे अमित बोरसे रमेश पिंगळे संचालिका सौ शोभा बोरस्ते सौ शालन सोनवणे भागवत बोरस्ते भास्करराव शिंदे ॲड शामराव पगार प्रकाश महाले संस्थेचे सभासद समिती सदस्य अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते. इमारत आर्किटेक्ट पुष्कर निकम व कॉन्ट्रॅक्टर रोशन खिरकाडे यांचा सत्कार ॲड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यास पालक हितचिंतक शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. फलक रेखाटन मोनाली निकम सविता पवार मोहन क्षीरसागर वर्षा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे, नरेंद्र डेरले यांनी केले. आभार शिक्षिका मंगल सावंत यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.
