
सेलू ( प्रतिनिधी )सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ९९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात ख्यातनाम कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले.महाराष्ट्राच्या विविध भागातून निमंत्रित करण्यात आलेल्या सुमारे तीसावर कवीं ,कवयित्रींनी आपल्या कविता सादर करून दाद मिळविली.साहित्य महामंडळाच्या मान्यवरांच्या हस्ते निमंत्रित कवींना छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.सेलू येथील निमंत्रित ज्येष्ठ कवी श्री.गौतम सूर्यवंशी यांनी गाऊन सादर केलेल्या “अभिजात वैभव ” या मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या कवितेस रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

त्यांनी आपल्या कवितेत माय मराठीचे भाषिक सौंदर्य व समृद्धीचा केलेला गौरव रसिकांची मने जिंकणारा होता.त्यांनी कविता सादर करतांना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा गौरव वाढविण्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहारात स्वतःची स्वाक्षरी मराठीतून करण्याचे आवाहन केले.
