

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४२ वा दिवस
हिंदुस्तानचे व्यावसायिक प्रयत्न हे फसताना दिसत आहेत, याचे कारण व्यावसायिक तत्वे आपल्याकडे चांगली मुरली नाहीत हे होय. व्यवसाय हा व्यवसाय आहे. तो काही दोस्तीखातर केलेला व्यवहार नव्हे. आपल्या ताब्यात असलेल्या वस्तूंचा प्रत्येकाने चोख हिशोब ठेवला पाहिजे. अगदी भुकेने मरायची वेळ आली तरी सुद्धा एका कामासाठी आलेले पैसे दुसऱ्या कामासाठी वापरले जाता कामा नयेत ही व्यावसायिक नीती आहे. याकामी सक्षम यंत्रणा आणि मजबूत व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पाश्चात्य जगतात रूढ असलेल्या पद्धतींपैकी कोणत्या पद्धती फेरफार करून हिंदुस्थानातील लोकांना मानवण्याजोग्या करता येतील यावर विशेष चिंतन झाले पाहिजे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १७ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण ३/४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ६ जानेवारी २०२६
★ संकष्ट चतुर्थी अंगारकी (मंगळी)
★ १८१२ मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन. (१८३२ मधे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही १८४० मधे त्यांनीच सुरू केले.)
★ १८६८ मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणु महाराज यांचा जन्मदिन
★ १९०७ मारीया माँटेसरी यांनी पहिली पूर्वप्राथमिक माँटेसरी शाळा सुरू केली.
★ १९२८ सुप्रसिध्द मराठी नाटक ‘सखाराम बाईंडरचे’ लेखक, पटकथाकार नाटककार, राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांचा जन्मदिन
★ १९५९ भारतीय क्रिकेट संघाचा वर्ल्ड कप विजेता यशस्वी कॅप्टन कपिलदेव निखंज यांचा जन्मदिन.
★ ✍🏻 पत्रकार दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
