
साऊ म्हणे.. .बहुजनहो, शिक्षण तुम्ही घ्या हो…
पूणे (बबनराव वि आराख) दुसरे आंतरराट्रीय फुले फेस्टिवल पूणे२० २६ येथे नुकताच साजरा झाला यात हजारो फुलप्रेमींनी देश विदेशातून येवून सहभाग घेतला . सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जागर काव्य अभिनय, एकपात्री प्रयोग याव्दारे करण्यात आला .
देशातील पहीली शाळा भिडेवाडा पूणे येथे सावित्री फुले यांनी सुरु केली त्याच कार्याचा जागर करण्यासाठी मा . फुलेप्रेमी विजय वडवेराव यांच्या नेतृत्वात सदर फेस्टीवलचे आयोजन दोनवर्षापासून पुण्यात करण्यात येते त्यामधे असंख्य फुलप्रेमी सहभागी होतात . त्यामध्ये भारतीय संविधान जागृती तसेच विनामुल्य वितरण करण्यात येते मा . फुले प्रेमी विजय वडवेराव यांनी ही चळवळ संपूर्ण राज्यात राज्या बाहेर देशभर राबवित असून स्वखर्चाने कार्यकमाचे आयोजन करीत संविधान वाटप करतात . तसेच महिलांना सन्मानार्थ साडी चोळी देतात .एस एम जोशी सभागृह गांजवे चौक पुणे येथे, संपन्न होत असलेल्या याच ४ दिवसीय फेस्टीवल मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील केळवद गावाचे फुलप्रेमी शाहीर मनोहर पवार यांनी अध्यक्षपद भूषविले असून काव्य जागरात सहभागी झाले . त्यांनी या पूर्वीही विविध अभियानात सक्रीय सहभाग घेतला असून सातत्याने कार्य करीत आहे . राज्यात अनेक ठिकाणीही आयोजनात कार्यकमात सहभाग असून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत . आंतरराट्रीय फुले फेस्टीवल भारतात हा एकमेव अभिनव संविधान जागृती आणि भिडेवाडा काव्य जागर अभियान आहे ज्यात हजारो फुलप्रेमी, बालके,स्रीया, पुरुष, लेखक, कवी प्रतिभावंत, सहभागी होत असतात .
ज्याची नोंद लिमका बुक मध्ये झाली आहे . फुले प्रेमी शिक्षक कवी विचारवंत विजय वडवेराव पुणे यांनी सदर कार्यक्रमाचे ऐतिहासीक आयोजन केले आहे .
