
नाशिक (प्रतिनिधी) अष्टौप्रहर स्वरहोत्र -नाशिक मधील ‘दिग्गज गायक, कलाकार, सृजन, रसिक आणि भक्त’ यांची मांदियाळी अनुभवास मिळाली.उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते.शास्त्रीय संगीतातील विविध रागांची अदाकारी अन् सोबतीला तितक्याच समर्थ साथसंगतीमुळे शंकराचार्य न्यासच्या बालाजी मंदिर प्रांगणात ‘ग्रंथ तुमच्या दारी’ तर्फे सादर अष्टौप्रहर स्वरहोत्राने निसर्गरम्य परिसर भारावून टाकला. विविधांगी कलाविष्कारांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या संकल्पातून अष्टौप्रहर स्वरहोत्राने अखंडित सेवेस शनिवारी सायंकाळी प्रारंभ केला.या उपक्रमाच्या संकल्पात अखंड चोवीस तास संगीत सेवा वगायन-वादनाची पर्वणी मिळाली विनायक रानडे, एनसी देशपांडे, आर्की. समीर देशपांडे, सीएल कुलकर्णी’,संजय कंक या सृजनांचं ‘प्रयोजन, संकल्पन, आरेखन, नियोजन आणि निवेदन’, सोबतीला बालाजी संस्थान यांचं आयोजन आणि नाशिक मधील समस्त कलाकारांचं समर्पण’ या त्रिवेणी संगमातून नाशिक शहरात शास्त्रीय स्वरांची मांदियाळी जमली होती शनिवार 3 जानेवारी 2026 संध्याकाळी 7 पासून ते रविवार 4 जानेवारी संध्याकाळी 7 पर्यंत बालाजी मंदिर , गंगापूर रोड , नाशिक येथे सलग 24 तास अष्टौप्रहर स्वरहोत्र संपन्न झाले.

गीता पठण, श्री सूक्त पठण, श्री राम नाम जपमाळ, अक्षर समिधा, रामनाम जप शोभायात्रा., महिलांची दुचाकीवरून चित्रांजली, चित्रकला पुष्पांजली ,गंध सेवा शंखनाद, सुलेखन रांगोळी, शिल्प शास्त्रीय गायन पदन्यास यांचा आविष्कार बघावयास मिळाला.एका अपूर्व विचार, संकल्पना, स्वराविष्कार आणि संधी याचे साक्षीदार होणे, नाशिककरांचे परम कर्तव्य होय. सर्वांची सुयोग्य साथ लाभल्यास एक नवीन संकल्पना रुजवण्याचा, सर्वांना एकाच मंचावर, एकाच विचारधारेवर रुजवण्याचा हा संकल्प यशस्वी झाला.भारतीय शास्त्रीय संगीत ‘गायन, वादन, नृत्य, आणि चित्रकला’ कापूस शिल्प, चित्रांजली, बाल चित्रांजली, वस्त्र चित्रांजली, म्युरल चित्रांजली, श्री. बालाजी अष्टवर्ण दिव्य मंडला, अमूर्त चित्रांजली, रांगोळी, पॉटरी,या अभिजात कलांचं ‘सेवा-समर्पण’. दिवसाच्या आठ प्रहराशी निगडीत विविध ‘थाट, राग, घराणी, पद्धती, वैशिष्ठ्य आणि गायकी’ सोबतीला विविध वाद्ये, वादन कौशल्य, नृत्य आणि विविध कलांचा संगम अनुभवयास मिळाला २५०/३०० महिला आणि संगीत शिकणारे विद्यार्थी व्यस्त होते एकीकडे ‘स्वर-होत्र’ सुरु होतांना, उदबत्यांचा घमघमाट, विविधरंगी रांगोळ्यांनी सजलेली वास्तू, प्रहराशी रंगसंगती साधण्याची कल्पना विलक्षण होती.नाशिक शहरातील सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात हजारो रसिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला .
