मनमाड ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेेडीअम स्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच बालिका दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आहेर शितल असुन विद्यार्थ्यांना ३ जानेवारी हा दिवस बालिका दिन तसेच सावित्रीबाई जीवनचरित्राबाबत माहिती दिली. पुर्वीच्या काळातील स्त्री जीवन आणि २१ व्या शतकातील स्त्री शिक्षणामुळे झालेला बदल यातील फरक सांगितला. सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवन समर्पणानेच आजची स्त्री अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभी राहिली आहे.घराचा उंबरठा आोलांडुन झळकत आहे.
विदयार्थीनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आल्या. तर स्वरा जाधव, ईश्वरी काळे,अनुष्का गिते इ.विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्र फिल्म दाखवण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षिका विद्या भालेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.