
नांदगाव ( प्रतिनिधी)सोमवार दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे इंग्रजी विभागातर्फे पदवी वर्गातील विद्यार्थ्यांकरीता इंग्रजी विषयातील करिअर संधी याविषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळे करिता तज्ञ मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ राजेश झनकर उपस्थित होते.यांनी इंग्रजी भाषेचा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या संधी व त्याकरिता घ्यावयाचे कौशल्य या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन यू पाटील यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात विद्यार्थ्यांनी सुयोग्य कौशल्याच्या आधारे व भाषेचा वापर करून जीवनामध्ये यशस्वी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सदरची कार्यशाळा संपन्न होणे करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन यु पाटील सर उपप्राचार्य डॉ मराठे, आय क्यू ए सी कॉर्डिनेटर प्रा.आटोळे व इंग्रजी विभागातील कार्यक्रम समन्वय प्रा संदीप दोंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यशाळेत मोठ्या संख्येने कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेच्या यशस्वी ते करिता भूगोल विभाग प्रमुख डॉ निगळे सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रसाद सर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अहिरे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए. बी. जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले
