
मायमराठीसमूहाचा चौथा स्नेहमेळावा नुकताच २७ व २८ डिसेंबर रोजी नृसिंहवाडी येथे संपन्न झाला. समूहप्रमुख सौ.शरण्या अभय भिसे देशपांडे (सातारा) यांच्या संकल्पनेतून साकारलेला मायमराठीसमूह म्हणजे महिलांचे हक्काचे व्यक्त होण्याचे व्यासपीठ होय.

“लिहा आणि व्यक्त व्हा” ही समूहाची टॅगलाईन असून नित्यनेमाने वेगवेगळ्या विषयांवर समूहातील लेखिका लिखाण करत असतात.हिंदू धर्म आणि अध्यात्म येथील प्रत्येक महिलेचा पाया आहे. कविता,कथा,ललित, स्फुट,मुक्तछंद असे सर्व साहित्यप्रकार इथे हाताळले जातात.समूहाची आत्तापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झालेली असून तीन पुस्तकांचे प्रकाशन या स्नेहमेळाव्यात झाले.

समविचारी सर्व वयाच्या, व्यावसायिक,नोकरदार, गृहिणी अशा सर्व स्तरांतील महिला या समूहाच्या सदस्या आहेत.समूहात संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व दिले जाते. लिखाणात आदर्शवत काही लिहिले जातेच ते आचरणात ही कसे आणले जाईल ?यावर समूहातील प्रत्येक सखी चिंतन करताना दिसते,आणि हाच पुरस्कार समजला जातो. सत्तर सदस्या असलेला हा समूह नोंदणीकृत नाही कारण सर्व निर्णय एकहाती समूहप्रमुख सौ.शरण्या भिसे देशपांडे घेत असल्याने सुसूत्रता अबाधित आहे. अन्नम् ब्रह्मा : पाककृतींचे पुस्तक, पुढच्या गोष्टी : लहान मुलांसाठी गोष्टी तसेच गीत रामायण ५६ गाण्यांचे रसग्रहण अशी तीन पुस्तके यावेळी लेखिकांच्या मान्यवर पिताश्रींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. “पायसदान” हे पुस्तक मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले आहे .ही समूहासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

नृसिंहवाडी येथे २७डिसेंबर रोजी ” सिर्फ” या संस्थेला समूहाने नुकतीच १,३१,१२१/- इतकी रक्कम पुस्तक विक्रीचा फायदा व लोकवर्गणीतून उभी करून दिली आहे. परिघाबाहेर जात काम करण्याचा या समूहाचा हा सैनिकांप्रती खारीचा वाटा सर्वत्र नावाजला जात आहे.
भविष्यातही समूहामार्फत असेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस समूहप्रमुख सौ. शरण्या अभय भिसे- देशपांडे यांनी बोलून दाखविला.
