
नांदगाव( प्रतिनिधी )दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी थोर समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मां. अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवाडी परिसरात विविध महिला संघटनांच्या वतीने प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडी, अंगणवाडी क्र. 619/03 (सेविका माया पगारे, मदतनीस सुमित्रा जगताप), सुजाता महिला मंडळ (आनंदवाडी), रमाई महिला मंडळ (आंबेडकर नगर), तसेच अंगणवाडी सेविका वनिता गरूड, शोभा शेवाळे, मुन्नाबाई खान सहभागी झाल्या.
याशिवाय स्त्री शक्ती शहरस्तर संघ यांच्या वतीने CLF मॅनेजर गंगावणे मॅडम, CRP उषा शिंदे, मनीषा काकलिज, ज्योती परदेशी मॅडम यांच्यासह अलका पांडे, जयश्री निकम, गीता शिंदे, जया देवकते, वाबळे ताई, चौधरी ताई, जयश्री खरात, तसेच भिमशिवशक्ती, सप्तशृंगी आणि आनंदवाडीतील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर नगरसेविकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. अंगणवाडी सेविकांनी स्वागत केले, तर महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ओव्या सादर केल्या. बचत गटातील महिलांनी गीतगायन करून कार्यक्रमात उत्साह भरला.

या प्रसंगी नवनिर्वाचित सर्व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. आनंदवाडी, कैलासनगर व हमालवाडा परिसरातील बचत गटांच्या महिलांनी नगरसेविकांचे विशेष कौतुक करत सत्कार केला.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगरसेविका व बचत गटांच्या महिलांनी एकत्र येऊन माननीय अंजुमताई कांदे व आमदार सुहास अण्णा कांदे यांना महिला सक्षमीकरणासाठी अपेक्षित कार्य करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर नगरसेविका अँड विद्याताई कसबे यांनी उपस्थित महिलां व मुलांना पेढे व मिल्कशेकचे वाटप करून सर्वांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेहा ताई कोळगे, जया ताई जगताप, विजयाताई चतुर, मधुमती वाघ, छाया जाधव, वंदनाताई पांडे, हेमा राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CLF गंगावणे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन माया पगारे यांनी केले.

महिला एकजुटीचे दर्शन घडवणारा व सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
