
नांदगाव ( प्रतिनिधी)दिनांक 03/01/2025 रोजी सावित्री बाई फुले जयंती निमित्ताने मां.अंजुमताई यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना महिला आघाडी,अंगणवाडी क्र.619/03 अंगणवाडी सेविका माया पगारे,मदतनीस..सुमित्रा जगताप, सुजाता महिला मंडळ आनंदवाडी ,रमाई महिला मंडळ आंबेडकर नगर व तसेच अंगण वाडी सेविका.वनिता गरूड,शोभा शेवाळे,मुन्ना बाई खान स्री शक्ती शहर स्तर संघाच्या. CLF मॅनेजर गंगावणे मॅडम,CRP.उषा शिंदे मॅडम, मनिषा काकलिज मॅडम,ज्योति परदेशी मॅडम व तसेच सदस्य ..अलका पांडे,जयश्री निकम, गिता शिंदे, जया देव कते,वाबळे ताई,चौधरी ताई जयश्री खरात, भिमशिवशक्ती बचत गट,सप्तशृंगी बचत गट व आनंद वाडी येथील बचत गटाच्या महिला चांगल्या संख्येने वेळेवर सावित्रीबाई फुले जयंती साजरी

करण्यासाठी उपस्थित राहुन नवनिर्वाचित,तरुण तडफदार नेतृत्व ,उच्चशिक्षित सर्व नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला सेविका यांनी स्वागत गित, प्रार्थना,घेऊन मान्यवर यांनी दीपप्रज्वलन केले बचत गटातील महिलांनी गीत गायन केले ,आनंदवाडी,कैलास नगर हमाल वाडा येथील बचत गटाच्या महिला नी सर्व नगरसेविका चे कौतुक करून सत्कार केले सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सर्व नवनिर्वाचित नगरसेविका व बचत गटातील महिला एकत्र येऊन माननीय अंजुमताई कांदे व आमदार सुहास अण्णा कांदे यांना अपेक्षित महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याचे आश्वासन सर्व उपस्थित महिलांनी दिले.

त्यानंतर नगरसेविका अँड विद्याताई कसबे यांनी सर्व बचतगटातील महिला मुले यांना पेढे, व मिल्कशेक वाटप करून आभार मानले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेहा ताई कोळगे जया ताई जगताप विजयाताई चतुर मधुमती वाघ छाया जाधव वंदनाताई पांडे हेमा राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CLF मॅनेजर गंगावणे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार अंगणवाडी सेविका माया पगारे मॅडम यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचा समारोप CLF CRP उषा शिंदे मॅडम यांनी जाहीर केले.

