
“स्त्रीशिक्षणाच्या पहिल्या ज्योतीला महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुल सिन्नरमध्ये प्रेरणादायी अभिवादन..”
सिन्नर: ३ जानेवारी २०२६.
ज्या दीपाने अज्ञानाचा अंधार दूर केला, ज्या माऊलीने स्त्रीशिक्षणाचा पहिला अक्षरदीप प्रज्वलित केला, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर संचलित महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुल, सिन्नर येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी व विचारप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या गौरवशाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री नामदेव प्रताप लोंढे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री नामदेव विष्णू लोणारे उपस्थित होते, तर स्त्रीशिक्षणाच्या विचारांना समकालीन संदर्भ देणाऱ्या प्रमुख वक्त्या मा.प्रा. डॉ.शर्मिला बागले यांच्या ओघवत्या व संवेदनशील शब्दांनी संकूल भारावून गेले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले आणि राजा सगर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्या क्षणी संपूर्ण परिसरात कृतज्ञतेची व आदराची भावना दाटून आली.
मा.संस्थेचे सेक्रेटरी नामदेव लोणारे यांनी आपल्या मातोश्री पार्वतीबाईंच्या वाढदिवसानिमित बालवाडीच्या विदयार्थांसाठी खेळणी साहित्य , प्राथमिक विभागासाठी इंग्रजी पुस्तकांचा सेट माध्यमिक विभागासाठी 2 फुटबॉल आणि सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप करत दातृत्वाचा पाठ घालून दिला.
शाळेच्या मा.मुख्या. सौ.संगिता राजगुरू यांनी आपल्या प्रास्ताविकातून सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे हृद्य दर्शन घडविले आणि फुले दांपत्याच्या विचारांवरच आपली संस्था नेहमी कार्यरत असते असे प्रतिपादित केले.
यावेळी सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. लोकशाहीतील प्रतिनिधींचा गौरव करताना समाजसेवेचा व लोककल्याणाचा संदेश अधिक दृढ झाला. यामध्ये मा.श्री सागर मुरलीधर भाटजिरे (गटनेता), मा. श्री उदय प्रभाकर गोळेसर, मा.श्री आशिष (शेखर )गोळेसर, मा. श्री अमोल अशोक झगडे, मा.सौ. गीता हरिभाऊ वरंदळ, मा. सौ. मनीषा योगानंद गवळी व मा.सौ. सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे यांचा समावेश होता.
बाभळीची फुले आणि आनंदी शिक्षणाच्या वाटा अशी दोन पुस्तके प्रकाशित झालेल्या ज्ञानवंत लेखिका, आजच्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. शर्मिला बागले यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून, त्या आजही प्रत्येक मुलीच्या शिक्षणामागील प्रेरणा असल्याची भावना आपल्या ओघवत्या शैलीत मांडली. शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मार्ग असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. पुणे विद्यापीठाला दिलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

तदनंतर नवनिर्वाचित नगरसेवक मा. श्री.उदय प्रभाकर गोळेसर यांनी एक स्री शिकली की कुटुंब शिकते पर्यायाने समाजशिक्षित होतो. म्हणूनच समाज हा फुले दांपत्याचा ऋणी आहे. फुले दांम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न किताब मिळावा यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
अध्यक्षीय मनोगतात मा.श्री नामदेव विष्णू लोणारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे बीज प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजविणे हीच आपली खरी जयंती असल्याचे सांगत, नव्या पिढीला समाजपरिवर्तनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.
संस्थेच्या संचालक मंडळातील मान्यवर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, समन्वयक सदस्य व संकुलाचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
त्यात प्रमुख मान्यवर पुढील प्रमाणे उपस्थित होते:
संचालक मंडळातील
मा.श्री दत्तात्रय दादा लोंढे (उपाध्यक्ष),
मा. श्री संजय विष्णुपंत माळी (सह सेक्रेटरी),
मा.श्री रामनाथ दत्तात्रय बलक (खजिनदार) ,
मा.श्री दत्तात्रय पांडुरंग गोळेसर (अध्यक्ष, सी. एस. आर. समिती),
मा. श्री दत्ता उद्धव झगडे (अध्यक्ष शा.व्य. समिती महिला महाविद्यालय),
मा.सौ सरला नवनाथ वरंदळ (अध्यक्ष शा. व्य.समिती उच्च माध्य.),
मा.सौ मंगल शाम झगडे (अध्यक्षा, शा.व्य. समिती माध्य. विभाग),
मा.श्री दिगंबर रामभाऊ पगर (अध्यक्ष शा.व्य.समिती प्राथ. विभाग)
संचालक मा.श्री सुधाकर लक्ष्मण गोळेसर,
संचालक मा. श्री मधुकर किसन खर्जे,
संचालक मा.श्री संदीप भाऊशेठ गवळी,
संचालक मा.श्री दत्तात्रय पोपटराव लोणारे
आणि समन्वयक सदस्य
मा. श्री बाबासाहेब बाजीराव भगत, मा. श्री मनोज निवृत्ती महात्मे
तसेच विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी जसे की,
श्री.आर.सी.वरंदळ (शिक्षणाधिकारी स. वि. प्र. शि संस्था)
श्री.एम.एन.देशमुख (प्राचार्य म. ज्यो. फुले शै.संकुल)
सौ.एस.व्ही.राजगुरू(मुख्याध्यापिका सा.फु. प्रा.शाळा),
सौ.एस.पी. काठे(प्रभारी पर्यवेक्षिका)
श्री.ई.जी.माळी (उपप्राचार्य उच्च. माध्य)
श्री.जी.के.महाले (प्राचार्य महिला महाविद्यालय)
श्री.टी.एम.बलक(उपप्राचार्य किमान कौशल्य विभाग)
सौ.ए.एम.खैरनार (अध्यक्षा, गुणवत्ता संवर्धन समिती)
आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच समाजातील मान्यवर नवनिर्वाचित नगरसेविका कांताबाई जाधव,महामित्र श्री.दत्ताजी वायचळे
माजी संचालक मा.श्री राजेंद्र भगत, मा.श्री प्रभाकर गोळेसर, मा.श्री राजेंद्र गोळेसर , मा. श्री योगानंद गवळी तसेच श्री सुरेश भाटजीरे, श्री.हरिभाऊ वरंदळ,पी.एस.आय मा.श्री विजय लोंढे , मा. श्री विलास लोंढे ,मा.श्री ज्ञानेश्वर उबाळे आवर्जून उपस्थित होते.
प्रत्येक मान्यवरांच्या उपस्थितीतून सावित्रीबाईंच्या विचारांना मिळणारा सामाजिक पाठिंबा यामुळे अधोरेखित झाला.
कार्यक्रमाचा समारोप कृतज्ञतेच्या भावनेने व प्रेरणादायी संदेशाने झाला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची मशाल पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांच्या मनात अधिक दृढ झाला. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथ.विभागाचे सांस्कृतिक प्रमुख श्री.अरविंद लोणारे सर यांनी केले तर आभार श्रीम.दिपार्ती आहेर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
