
नांदगाव ( प्रतिनिधी ) मुहूर्ताप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची जयंती दिनांक 3.1.2026 रोजी असल्याने तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक 3.1.2026 रोजी असल्याने या महान विभूतीतिच्या जयंतीचे आयोजन नांदगाव मंडल भा ज पा तर्फे 3.1. 2026 रोजी करण्यात आले उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी बजरंग दल मातृशक्ती प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झालेल्या सौ अक्षदा कुलकर्णी सचिव सौ बबीता ताई तोरणे शिवकन्या संगीता ताई सोनवणे बालिका दिनानिमित्त काही बालिकांचा सत्कार शाल गुलाब पुष्प देऊन करण्यात आला

याप्रसंगी उपस्थित मा. जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा दिगंबर ( सजन तात्या )कवडे नांदगाव मंडल भाजपा उपाध्यक्ष सौ ताराताई शर्मा अक्षदा कुलकर्णी संगीता सोनवणे , प्रदीप थोरात भारत काकड सर ,राजेंद्र गांगुर्डे यांनी मनोगतात व्यक्त केले व राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा आपल्या मनोगतानुसार गौरव केला
याप्रसंगी नांदगाव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तसे या प्रसंगी भालूर मंडल अध्यक्ष सौ मनीषा ताई काकड मा जिल्हा चिटणीस डॉक्टर राजेंद्र आहेर नांदगाव मंडल सरचिटणीस श्री सतीश शिंदे, सचिन पांडे, बबन मोरे, ॲड उमेश सरोदे, डॉ.बी .के आहेर संजय पटेल ,दिनेश जेजुरकर
ॲड मनीषाताई पाटील ,गणेश शर्मा ,मनोज शर्मा ,शांताराम जाधव,सौ बबीता तोरणे,
सौ मानसी जोशी,ॲड.आढाव ताई
सौ किरणताई बागोरे, अन्नपूर्णा जोशी इत्यादी उपस्थित होते.

