
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शिवसुर फार्माचे संचालक रविंद्र गिरी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे येथील विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी विविध विषयांवरील २१ पुस्तकांचा समृद्ध संच शाळेला भेट दिला.
या पुस्तकांचे वितरण नवनिर्वाचित नगरसेवक अनिल सरवार यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी पुस्तकांचा स्वीकार केला.
या पुस्तक संचामध्ये “शिवाजी कोण होता?”, नूतन मराठी शब्दकोश, सुगम मराठी लेखन, माय इंग्लिश, शिक्षण तपस्वी जे. पी. नाईक, विज्ञान प्रश्नमंजुषा, रेषा–रंग आणि भाषा यांसारख्या दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांचा समावेश असून, त्यांचा विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन व व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच मोठा उपयोग होणार आहे. या प्रसंगी रविंद्र गिरी, भानुदास गोसावी, भैरवनाथ गोसावी, कलाशिक्षक काशिनाथ गोसावी, संजय गिरी, शरद गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावणाऱ्या या उपक्रमाबद्दल शिवसुर फार्मा व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले.
