
नांदगाव (प्रतिनिधी)शनिवार दि.3 जानेवारी 2026 रोजी व्ही. जे. हायस्कूल नांदगाव येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे सर उपमुख्याध्यापक डॉ. श्री. नांदुरकर सर प्रमुख पाहुणे श्री. पृथ्वीराज शिवाजी वडघुले सर कार्यकारिणी सदस्य श्री. मधे सर श्री. गुलाब पाटील सर विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

. मान्यवरांनी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले उपमुख्याध्यक डॉ. श्री नांदूरकर सर यांनी प्रास्ताविकातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी महती सांगितली. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यात कौटुंबिक व स्वतःवर बेतलेले वाईट प्रसंग आणि अनुभवातून कार्यात अडथळे येत असूनही आपले शैक्षणिक कार्य ज्ञानगंगेचा वारसा पुढे कसा अखंडपणे चालू ठेवला असे प्रास्तविकातून सांगितले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत सौ. शिंदे मॅडम यांनी करून दिला. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनीनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत भाषणे व स्वगत सादर केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सावित्रीच्या लेकी
म्हणून विद्यार्थिनींनी सावित्रीबाईचे शिक्षणाचे कार्य भाषणातून सांगितले.

वेशभूषा सादरीकरण – 1)कु. विधिका चव्हाण 7 वी ब
2) कु.जागृती चव्हाण 7वी ब
3)कु.ऋतुजा शिसोदे 7वी ब
4)कु.ज्ञानीशा चोपडा 6वी अ
5)कु.मयुरी जगताप 6वी अ
भाषणे सादरीकरण –
कु.आराध्या बागुल 6 वी अ
कु.दुर्वा बोरसे 6वी अ
कु.हर्षाली साठे 6वी ब
कु.अंकित गीते 6वी ब
कु.अजय गायखे 6वी क
कु.भूषण कोराळे 6वी क
ओवीगायन -कु. त्रिशा शिंदे
प्रमुख पाहुणे श्री. पृथ्वीराज शिवाजी वडघुले यांनी सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक व समाजसुधारणेच्या कार्या विषयी माहिती सांगितली.
आजच्या काळात मुलींना स्वसंरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून काही प्रात्यक्षिकातून आपले संरक्षण कसे करावे हे दाखवून दिले. यातून विद्यार्थिनींचे धाडस वाढविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रिषीता टिळेकर(7वी अ) हिने केले. मान्यवरांचे आभार कु नक्षत्रा घुगे हिने मानले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्ना झाला. मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला.
