
साकोरा(प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील साकोरा मूळडोंगरी रस्त्यावर काल रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने व मशिन मध्ये बिघाड झाल्याने कोंबडीचा भरलेला ट्रक अचानक पलटी झाल्याने कोंबडींचा गुदमरून मृत्यू झाल्याने पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,

पांढरवड येथील दिलीप गुलाब चव्हाण यांच्या पोल्ट्रीतून बांद्रा मुंबई येथे घेऊन चाललेल्या बॉयलर कोंबडीचा ट्रक (एम एच ०४ MH २०३८) निमतळे वस्तीलगत गाडीत बिघाड झाल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला काल शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास पाच फूट दरीत पलटी झाला. गाडीत चार टन वजनाच्या एक हजार सातशे कोंबड्या होत्या. गाडी अचानक खड्ड्यात गेल्याने सर्व कोंबड्या एकमेकांवर आदळल्या गेल्या कोंबड्या पिंजऱ्यामध्ये पॅक असल्याने जागीच गुदमरल्या व मरण पावल्या. आजचा जिवंत कोंबडी १२० रुपयाचा भाव आहे. गाडीत चार टन वजनाच्या कोंबड्या भरलेल्या असल्याने पाच लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.ट्रक चालक इकबाल किरकोळ जखमी झाला असून, आज शनिवारी मृत कोंबड्या जेसीबीच्या साह्याने खड्डा करून त्यात बुजवण्यात आल्या.
