
मुळडोंगरी ( प्रतिनिधी)…श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी ,येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एस.जी. राठोड साहेब, सचिव सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका सौ.बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बोरसे मॅडम व उपशिक्षक श्री दराडे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी मनोगत पार पडले, त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय दिला . विद्यार्थ्यांनींनी विविध वेशभूषा केल्या. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री दराडे सर यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनाविषयी माहिती दिली. मुलींसाठी शाळा सुरू करताना काय काय अडचणी आल्या याबाबत मार्गदर्शन माहिती सांगितली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
