
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४० वा दिवस
प्रभावित करणारी, भारून टाकणारी भाषणे, चतुर युक्तिवादाने नटलेली व्याख्याने आपण काही कमी ऐकतो का? परंतु घरी गेल्यावर त्यांतले अक्षरही आपल्या लक्षात राहत नाही आणि दुसरे कोणीतरी अगदीच साधेपणाने बोललेले चारच शब्दही आपल्या अंतःकरणात खोलवर रुजून राहतात, आपला पाठपुरावा करतात. आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात. जी व्यक्ती आपल्या शब्दात आपले व सर्वस्व ओतून बोलत असते तिच्या शब्दांचा परिणाम होतो. परंतु तिचे व्यक्तीत्व तसेच प्रभावशाली असावे लागते. सर्व प्रकारच्या शिक्षणात आदान-प्रदान होत असते. गुरु देत असतात, शिष्य घेत असतात. परंतु देणाऱ्याजवळ देण्यासारखे विपुल असले पाहिजे आणि घेणाऱ्याने ओंजळी भरभरून ते घेतले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १५ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ४ जानेवारी २०२६
★ १६४३ ब्रिटिश शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्मदिन
★ १८०९ अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपी तयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्मदिन
आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन…
★ १८८१ लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ हे मराठी वृत्तपत्र सुरु केले.
★ १९९४ सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांचा स्मृतीदिन
