
वसंत गोसावी (सिन्नर प्रतिनिधी)डुबेरे केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेत पाटोळे शाळेचे दणदणीत वर्चस्व :डुबेरे (ता. सिन्नर) येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळेने उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

शाळेने तब्बल २८ स्पर्धा प्रकारात पदकांची कमाई करत यशाचा नवा इतिहास घडवला. यामध्ये १५ स्पर्धांत प्रथम, १० स्पर्धांत द्वितीय तर ३ स्पर्धांत तृतीय क्रमांक पटकावत पाटोळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली.

लहान गटातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी-
लहान गटात काजल हरिश्चंद्र खताळे हिने (धावणे मुली) प्रथम व वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. वंश दीपक गोफणे (धावणे मुले प्रथम), आलिया समीर मनियार (चित्रकला -द्वितीय), वेद शंकर खैरनार (बुद्धिबळ- द्वितीय व पाचवी स्पेलिंग बी- प्रथम), सुप्रिया सजन सांगळे (चौथी स्पेलिंग बी- प्रथम), वेदा दत्तात्रय खताळे (मॅथ बी गट पहिली-दुसरी- तृतीय), आरोही विष्णू खताळे (मॅथ बी गट तिसरी-चौथी- पाचवा) यांनी वैयक्तिक यश संपादन केले. तसेच समूह नृत्य प्रकारातही लहान गटाने द्वितीय क्रमांक मिळवून मान वाढवला.
मोठ्या गटातही यशाची परंपरा कायम
मोठ्या गटात त्रिवेणी विलास जाधव (धावणे मुली- प्रथम), साई रावसाहेब चकोर (धावणे मुले- द्वितीय), श्रुती नवनाथ आंधळे (वक्तृत्व- प्रथम), आयेशा समीर मनियार (चित्रकला- प्रथम), ओमकार लक्ष्मण सांगळे (बुद्धीबळ- प्रथम) यांनी लक्षवेधी कामगिरी केली. स्पेलिंग बी मध्ये स्वरांगी नवनाथ आंधळे (सहावी -प्रथम) व प्रिया राजेंद्र खताळे (सातवी- प्रथम) यांनी बाजी मारली. मॅथ बी मध्ये वेद शंकर खैरनार (पाचवी ते सहावी -प्रथम) व प्रिया ज्ञानेश्वर खताळे (सातवी ते आठवी -प्रथम) यांनी यश मिळवले.
सांस्कृतिक व क्रीडा प्रकारात प्रांजल सुरेश गुरकुले (वैयक्तिक गीतगायन -द्वितीय), कोमल देविदास कराड (वैयक्तिक नृत्य- प्रथम), समूह गीतगायन- प्रथम, समूह नृत्य- द्वितीय, तसेच कबड्डी व खो-खो (मुले-मुली) सर्व संघांनी द्वितीय क्रमांक मिळवून संघभावना व शिस्तीचे दर्शन घडवले. या सर्व यशामागे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्यासह सुनिता बर्वे, कैलास पवार, मीना सोनवणे, स्वाती खताळे, सुनिता खताळे, प्रतिभा पवार आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल विस्तार अधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे, सरपंच सौ. संगिताताई आव्हाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे, उपाध्यक्ष रावसाहेब चकोर, माजी अध्यक्ष सोपान खताळे, देविदास कराड, रामहरी खताळे, निवृत्ती कराड, तसेच ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
पाटोळे शाळेच्या या उज्ज्वल यशाने केंद्रस्तरीय स्पर्धेत शिक्षणासोबत कला व क्रीडेतही शाळेची ओळख ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
