
पोखरी :(प्रतिनिधी ) माऊली माध्यमिक विद्यालय पोखरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुमारी वर्षा देवरे (इयत्ता नववी) यांनी भूषविले.
कार्यक्रमात विद्यार्थिनी ऋतुजा शिंदे, प्रियंका भोई, परि पागे, वैष्णवी सोनवणे, तेजस्वी सोमासे, सिद्धी महाजन, गीता काकळीज, चांदनी पारधे तसेच विद्यार्थी मोहन शिंदे व युवराज भोई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे केली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर, ज्येष्ठ शिक्षक घोडके सर, कदम सर, निकम मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. घोडके सर यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
