
सरताळे ( प्रतिनिधी)-ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित अनुदानित प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सरताळे येथे आज दिनांक 3-1-20225 वार शनिवार रोजी संस्थापक सरचिटणीस मा. अप्पासाहेब श्री रमेश पगार यांच्या अध्यक्षतेत व संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथमिक आश्रमशाळा मुख्याध्यापीका श्रीमती नम्रता पगार,प्राचार्य श्री समाधान चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.प्राथम मान्यवरांचे हस्ते प्रतिमापुजन झाले

नंतर आश्रमशाळा विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. सदर प्रसंगी अप्पासाहेब पगार यांनी मुलींना शिक्षणाचं महत्व पटवुन देत शिकाल तर टिकल म्हणत शासनानं उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घेण्याचे आव्हान केले

तर नम्रता पगार मॅडम व समाधान चौधरी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचं महत्व सांगत शिक्षणा मुळे मुलींनी आज विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा, मा. प्रकल्प अधिकारी कश्मिरा संखे मॅडम व आदरणीय आयुक्त साहेब लीना बनसोड मॅडम यांचा दाखला देत ‘शिकलेली आई घराला पुढं नेई’ सांगत मुलींना उच्च शिक्षित होण्याचे आव्हान केले. कार्यक्रम प्रस्ताविक श्री प्रा. दिपक सुर्यवंशी केले तर सुत्र संचालण श्री प्रा. अरविंद कोळी यांनी सांभाळले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रम सांगता झाली.
