
आसरखेडे ( प्रतिनिधी ) दि.३/. जनता विद्यालय आसरखेडे येथे स्काऊट गाईड अंतर्गत खरी कमाई प्रात्यक्षिकासाठी विद्यालयात आज आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय समितीचे सदस्य श्री नामदेवराव दिवटे, व श्री साहेबराव चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. व स्वाउट गाईड ध्वजाचे ध्वजपुजन शालेय समितीचे सदस्य श्री सुधाकराव थोरमिसे यांनी केले. ध्वजाचे ध्वजारोहण म. वि. प्र. चे जेष्ठ सभासद श्री शिवाजीराव दिवटे यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कापडनीस. सी. आर. यांनी केले. आनंद मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावी घ्या सर्व मुला मुलींनी सहभाग घेतला. प्रसंगी विद्यालयात पालक माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच शालेय समितीचे सदस्य श्री गोरख ढगे, श्री अजयभाउ जाधव यांनी मुलांचे कौतुक केले. व शालेय समितीचे अध्यक्ष श्री वैभव निमसे यांनी यशस्वी आयोजनाबद्दल शालेय परीवाराचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले. आनंद मेळाव्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
