
भोसरी (प्रतिनिधी ) नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी पुणे 39 च्या वतीने आज भागवत एकादशी निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात”वारी” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी अजित वडगावकर म्हणाले की, ” नक्षत्राचं देणं काव्यमंच “ही संस्था कवीसाठी एक संजीवनी आहे. एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कवितांचे संपादन करून कवी राजेंद्र सोनवणे उर्फ वादळकार यांनी “वारी” या काव्यसंग्रह तयार केला आहे. अनेक कवींना सन्मानाचं आणि आदराचे व्यासपीठ मिळून देण्याचं काम त्यांची संस्था सातत्यपूर्ण करत आलेली आहे. गेले पंचवीस वर्षे संस्थेने विविध उपक्रमांचे आयोजन करून कवितेची चळवळ उभी करताना या माय मराठीची सेवा करण्याचे काम केल आहे. “

यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, मंत्रालयातील उच्च शिक्षण खात्यातील सहाय्यक कक्ष अधिकारी डॉ.प्रमोद सावंत, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर ,कवी रामदास हिंगे, डॉ.अजय सकपाळ, प्रीती सावंत,ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे,नामदेव सांगळे, संतोष देशमुख, वारकरी याप्रसंगी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीच्या समोर हा सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या नाम घोषात संपन्न झाला.
