
लासलगाव दि. ३ ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हीरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, डॉ.संजय निकम, कला मंडळ प्रमुख प्रा.किशोर गोसावी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, कार्यालय अधीक्षक श्री.रविंद्र होळकर, ग्रंथपाल प्रा.गुरुदेव गांगुर्डे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर व कला मंडळाचे सर्व सदस्य यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
