
नाशिक रोड (प्रतिनिधी)दि एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत आज शनिवार दि.०३/०१/२०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बाजपेयी व उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी,मिलिंद कोठावदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बाजपेयी यांनी यावेळी सावित्रीबाई फुले त्यांनी पेटविलेल्या स्त्री शिक्षणाच्या ज्योतीमुळे आजची स्त्री शिक्षित,सक्षम होऊन विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहे,पण त्यांच्या विचारांतील अज्ञान रुढी आणि भेदभावाविरुद्ध लढण्याची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे.जिथे आजही स्त्रियांना समान हक्क आणि आदर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.तसेच महिला सक्षमीकरण हा केवळ महिलांचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा प्रश्न आहे.म्हणूनच महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समानसंधी आणि अधिकार देणे ही काळाची गरज आहे.व पुढे त्यांनी करिअर म्हणून विद्यार्थिनींनी नेव्हीकडे वळावे,असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचे उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांनी मनोगतातून शिक्षण हेच आपले शस्त्र आणि त्या शिक्षणाच्या बळावर आजच्या अन्यायाविरुद्ध,विषमतेविरुद्ध,रुढीविरुद्ध लढावयाचे आहे.त्यात स्त्री शिक्षणाचे महत्त्व,समानतेचा संदेश,समाजसुधारणेचा निर्धार आणि आत्मविश्वास यावर भर दिला जातो.पुढे त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व सांगून *”लढावयाचे आता…”* या प्रेरणादायी कवितेतून यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
तसेच ८-अच्या काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले त्यांच्या कार्याची माहिती, गाणे,चोरोळ्यामधून सादर केले.कार्यक्रमाचे नियोजन चेतना टोपले,प्रतिभा महाजन यांनी केले.सुत्रसंचालन कु.मानसी पाटील व कु.संस्कृती शिंपी ८-ब यांनी तर आभारप्रदर्शन कु.मानसी पाटील ८-अ हिने केले.फलकलेखन सायली मुळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी,सेक्रेटरी हेमंत बरकले,शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे,यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बाजपेयी,अधिक्षिका मीना वाळूंजे,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे,पर्यवेक्षिका सुषमा गवारे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य कैलास बागुल,भारती चंद्रात्रे,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते.
