नासाका विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी अभिवादन करताना मुख्याध्यापक अरुण पगार, पालक, विद्यार्थी यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी.
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात पालक प्रकाश आडके, जितेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर धांडे, शिक्षक-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विचार मांडले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनीही अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास लहांगे यांनी आभार मानले.