

३ जानेवारी २०२६ क्रांतिज्योती,साविञीमाई फुले व संविधान सभा सदस्य जयपालसिंह मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमीत्त त्यांना सिन्नर येथे महामित्र परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाई फुले व जयपालसिंह मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
यावेळी विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की साविञीमाई फुले या विद्येच्या ख-या देवता होत्या पुर्वी बहुजनांना,स्रीयांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.लोकांमध्ये समता,बंधुता नव्हती शिक्षणाचा अभाव होता.त्यामुळे महात्मा फुले व क्रांतिज्योती साविञीमाई फुले यांनी बहुजनांना स्रीयांना शिक्षण देण्याचे ठरविले.बहुजनांना शिक्षण देण्याला घरातुनच त्यांना विरोध होऊ लागला त्यामुळे त्यांना स्वत:चे घर सोडावे लागले. शाळा काढण्यासाठी उस्मान शेख,नावाच्या उदार व्यक्तिमत्व असणा-या मुस्लिम बांधवाने आपला वाडा महात्मा फुले यांना दिला.महात्मा फुले व साविञीमाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली.परंतु काही कर्मठ लोकांनी त्यांना विरोध करून म्हणाले की,”धर्म बुडाला…जग बुडणार…कली आला”…असे म्हणायला लागले.त्यांना दगड-धोंडे,माती शेणगोळे फेकुन मारू लागले पण न डगमगता त्यांनी शिक्षण चालुच ठेवले.बहुजन व स्रीया शिकु लागले.बालविवाह प्रथा,विधवांचे केशवपन अशा कु प्रथांना विरोध करून विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा व बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.साविञीमाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची चळवळ आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातुन केला.पुण्यामध्ये प्लेगची भयंकर साथ आली होती माणसे दगावत होती.त्याला प्रतिबंध म्हणुन त्यांनी ससाणे माळावर दवाखाना सुरू केला.प्लेग रोग्यांची सेवा करताना त्यांना प्लेग झाला व १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.अशा या महान आद्यशिक्षिकेमुळे स्रीया आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती साविञीमाई फुले यांना “भारत रत्न” हा पुरस्कार सरकारने द्यावा.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जयपालसिंह मुंडा हे राजनितिज्ञ,लेखक,पञकार,संपादक,शिक्षणतज्ञ,समाज अभ्यासक होते.ते १९२५ मध्ये ‘ऑक्सफोर्ड ब्लू’ हा किताब मिळवणारे हॉकी चे एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. १९२८ ला ओलिंपिकमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली हॉकीचं भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं.आदिवासी समाजाच्या समस्यांची जाण असलेले जयपालसिंह मुंडा हे १९३८ मध्ये आदिवासी महासभेचे अध्यक्ष झाले. व त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी बिहार राज्यातून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी केली.जल जमीन जंगल यावर पहिला अधिकार आहे यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती केली.आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातुन खासदार होऊन संविधान सभा चे सदस्य बनले व जल जमीन जंगल यावर आदिवासींचे हक्क अधिकार अभादित रहावे यासाठी संविधान सभेत आवाज उठवून संविधानात तरतूद करण्यासाठी भाग पाडले. संविधान निर्मिती साठी त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं.त्यांच्या महान कार्याला आदिवासी समाज कधीच विसरू शकणार नाही.
अशा या महान विद्येची खरी देवता साविञीमाई फुले व संविधान निर्मिती साठी योगदान देणारे संविधान सभा सदस्य जयपालसिंह मुंडा यांना विनम्र अभिवादन!..
या कार्यक्रमाचे सुञसंचलन योगेश सोनवणे यांनी केले.तर प्रास्ताविक विजय मुठे केले व आभार रुपेश मुठे यांनी मानले
या कार्यक्रमाला महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, किरण मुठे,विजयकुमार खांडे,रुपाली खांडे, मिरा खांडे,मंगल पाडवे,इश्वरी खांडे,दीक्षा खांडे,योगेश सोनवणे, गोकुळ खताळे, हरीभाऊ लोणारे,किशोर माळी आदि उपस्थित होते.
