
ओझर: दि.३ वार्ताहर
स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे समिती प्रमुख संगीता भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी विद्यालयाच्या सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. सातवी ड च्या विद्यार्थिनी कु.श्रुती विलास गोसावी, वैष्णवी राजेंद्र पाटील, आराध्या हर्षल वाघ यांनी बालिका दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. तसेच ज्ञानेश्वरी रिकामे, ईश्वरी मंडलिक, वैष्णवी पाटील, समृद्धी जगताप, गौरी सपाटे, श्रुती गोसावी या विद्यार्थिनींनी ‘मी सावित्री बोलतेय’ ही नाटिका सादर केली. संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ओवी गायली. प्रास्ताविक शिक्षिका संगीता भदाणे यांनी केले. फलक लेखन सविता पवार मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले. क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड उज्वला जाधव मनोरमा सोमवंशी यांनी शिस्तीसाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन नरेंद्र डेरले यांनी केले.आभार शितल हांडोरे यांनी मानले.
