
मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद.
नांदगाव (प्रतिनिधी)- मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने ' बालिका दिन ' उत्साह साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व उपस्थितांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यालयातील इ.५ वी च्या विद्यार्थ्यांनी लावण्या देशमुख हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य व ऋणनिर्देश व्यक्त केले.
उपशिक्षिका देविका चोळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह १३ वर्षाचा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर सावित्रीबाईंना महात्मा ज्योतिबा फुले यांनी घरीच लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांनी श्री शिक्षिका होण्याचा स्वप्न बाळगून प्रशिक्षण पूर्ण केले. त्या काळी स्त्रियांनी शिकणे हे पाप समजले जाई, तरीही त्यांनी हा मार्ग निवडला.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यात काढली. लोक सावित्रीबाई च्या अंगावर चिखल आणि शेण फेकत. त्यांनी १८५३ मध्ये ‘ बालहत्या प्रतिबंधक गृह ‘ सुरू केले. त्यांनी त्याकाळी समाजात असणारा स्पृश्य -अस्पृश्य भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
सावित्रीबाई उत्तम लेखिका व कवयित्री होत्या. ‘ काव्यफुले ‘ हा त्यांच्या पहिला काव्यसंग्रह तर ‘ जा, शिक्षण घ्या’: हा कवितासंग्रह होता.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या मनोगतात स्री शिक्षणाचा जिवनपट कसा सुरू झाला हे समजावून सांगितले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका स्मिता केदारे तर आभार जया गवळी यांनी मानले.
