
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३९ वा दिवस
स्वाती नक्षत्राच्या वेळी जो पाऊस पडतो त्याचा थेंब जर उघडलेल्या शिंपल्यात पडला तर त्या थेंबाचा मोती होतो. शिंपल्याला हे माहीत असते. म्हणून स्वाती नक्षत्र आकाशात प्रकाशू लागले, की तो शिंपला सागराच्या पृष्ठभागावर येतो आणि आतुरतेने ओंजळ उकलून त्या मूल्यवान जलबिंदूची वाट पाहत राहतो. शिंपल्यात थेंब पडला, की तो शिंपला आपला पाखा मिटून घेतो आणि सागरतळ गाठतो. मग तेथे सावकाश त्या थेंबाचे सुंदर, तेजस्वी मोती बनवितो. आपणही असेच केले पाहिजे. प्रथम श्रवण करावे, मग समजून घ्यावे, नंतर एकाग्र चित्ताने कोणत्याही विलोभनाकडे लक्ष न देता आपण आपल्या अंतर्यामी जे सत्य आपल्याला गवसले आहे त्याचा विकास करावा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १४ शके १९४७
★ पौष पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ३ जानेवारी २०२६
★ शाकंभरी पौर्णिमा
★ शाकंभरी नवरात्री समाप्ती
★ १८३१ स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजसेविका, “क्रांतीज्योती” सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती
★ १९५० पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
★ १९५२ स्वतंत्र भारतात संविधानानुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यात.
★ २००० स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला आरोग्यमंत्री, गांधीवादी कार्यकर्त्या डॉ सुशीला नायर यांचा स्मृतीदिन
★ २००२ इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. सतीश धवन यांचा स्मृतीदिन.
★ महिला मुक्ती दिन,”बालिकादिन”
★ खंडोबा महाराज यात्रोत्सव, श्रीक्षेत्र चंदनपूरी ता. मालेगाव (नाशिक)
