
नांदगाव:(प्रतिनिधी) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर व बालमंदिर, नांदगाव येथे सन २०२५-२६ चा ‘वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कलागुणांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती व उद्घाटन
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजय (आण्णा) वाल्मिक परदेशी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. सागरभाऊ मदनराव हिरे, माजी विद्यार्थी तथा इंजिनिअर मा. श्री. सुहास वसंतराव कुलकर्णी आणि भा.ज.पा.चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा. श्री. दत्तराज रमणलाल छाजेड उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव
कार्यक्रमात विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ईशस्तवन इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्यद्वारे सादर केले.
यामध्ये प्रामुख्याने:फंक्शनल इंग्लिश: आराध्या काळे, श्रेया पगार, स्वरा पाटील (ग्रेड १) आणि गुंजिता ठाकरे, आराध्या कोरडे (ग्रेड २) यांचा सन्मान करण्यात आला.NTS शिष्यवृत्ती: अवनी बजाड, अनमोल सदगीर (इयत्ता ४ थी) आणि मनस्वी सूर्यवंशी, संस्कृती सोर (इयत्ता ३ री) यांनी यश संपादन केले.इतर यश: संस्कृत ज्ञान परीक्षेत १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तर सकाळ चित्रकला आणि नवनीत चित्रकला स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली. लंगडी व थ्रो बॉल संघाने क्रीडा क्षेत्रात शाळेचे नाव उज्ज्वल केले.विशेष प्राविण्य: रिद्धी अविनाश सोनवणे (वेदास), राधिकादेवी निषाद (कॉम्प्युटर टॅलेंट) आणि जिल्हास्तरीय निवड झालेल्या १९ विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
प्रशासनाचे नियोजन
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे अधीक्षक श्री. भैय्यासाहेब तानाजी चव्हाण, मुख्याध्यापिका सौ. सुनीता बाळासाहेब जाधव, शिक्षक प्रतिनिधी श्री. दीपक बबनराव नारळे, तसेच पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. अश्विनी कुमावत व शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आशा शेवरे मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री संजीव वाघ सर यांनी केले.
