
पुणे (प्रतिनिधी) पुणे म्हाळुंगे येथील हर्षद नारायणे व ऋतुजा नारायणे या आय.टी दांम्पत्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे गिर्यारोहकांच्या मदतीने कळसूबाई शिखर सर करत नववर्षाचे स्वागत केले. सूर्योदयाच्या सोनेरी किरणात शिखर स्वामिनी कळसूबाई मातेचे दर्शन घेतले व सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत केले. आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला. व स्वच्छता व प्लास्टिक युक्तीचा उपस्थितांना संदेश दिला. यावेळी राज्यभरातील अनेक गिर्यारोहक उपस्थित होते.


